

बांगलादेशी नागरिकास अटक
धारावी, ता. १८ (बातमीदार) : वडाळा पूर्व येथे अँटॉप हिल पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली. बांगलादेशमधील जिल्हा खुलना, लघुहाटी येथील नागरिक असलेल्या मिंटो सलीम शेख यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिस उपआयुक्त परिमंडळ ४ यांच्या मार्गदर्शनाखाली अँटॉप हिल पोलिस ठाण्यातील दहशतवाद विरोधी कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांची पथके नेमण्यात आली. त्याच्याकडे नावाची चौकशी केली असता व भारतात येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वैध प्रवासी कागदपत्रांची मागणी केली असता, अशी कोणतीही कागदपत्रे त्याच्याकडे नव्हती. पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.