

जमिनीच्या वादातून तरुणाची हत्या
प्रेयसीसह पाच जणांना अटक
भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : उत्तर प्रदेश येथील कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणातून जोगेश्वरीतील (मुंबई) ओलाचालक अक्रम कुरेशी (वय २२) याला फसवून भिवंडी येथे भेटण्यास बोलावून आरोपींनी त्याची हत्या केल्याप्रकरणी प्रेयसीसह पाच जणांना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी नुकतीच अटक केली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी पोलिस ठाणे हद्दीत मौजे पोगाव गावाजवळ तानसा पाइपलाइनशेजारील रस्त्यावर १७ जानेवारीला अक्रम इकबालुद्दीन कुरेशी हा ओलाचालक भाडे घेऊन आला असता अज्ञातांनी लोखंडी रॉड व दगडाने ठेचून त्याची हत्या केली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून संशयित महिला जस्सी तिवारी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता या हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले. महिलेकडे केलेल्या तपासानंतर मोहंमद कैफ मोहंमद रफिक कुरेशी, इसामुद्दीन रियाजुद्दिन कुरेशी, सलमान मो. शफिक खान, सुहेल अहमद कुरेशी (सर्व रा. मौजे हैदरपूर, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश) यांना पोलिसांनी तेथे जाऊन शिताफीने अटक केली. दरम्यान, मृत अक्रमच्या कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.