

सायन स्थानकात खाद्यपदार्थविक्रीचे स्टॉल बंद
पिण्याचे पाणी मिळेना; प्रवाशांना नाहक त्रास
धारावी, ता. १८ (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील सायन रेल्वे स्थानकातील फलाटांवर गेल्या अनेक महिन्यांपासून उपाहारगृह तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानकात प्रवेश करताना प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच फलाटावर खाद्यपदार्थ मिळत नाहीत. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
रेल्वे स्थानकासमोरील वाहतूक पूल तोडल्याने प्रवाशांचे स्थानकात येण्याचे अनेक मार्ग बंद झाले आहेत. प्रवासी मिळेल तिथून स्थानकात प्रवेश करतात. त्यातच प्रवाशांना काही खाद्यपदार्थ किंवा पिण्यासाठी पाणी घ्यायचे असेल, तर स्थानकावर उपलब्ध होत नाही. आधी स्थानकावरील फलाट क्रमांक एक व दोनवर उपाहारगृह, खाद्यपदार्थ व पाणीविक्रीचे स्टॉल उपलब्ध होते. तेव्हा प्रवाशांना खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होत असत.
स्थानकातील खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल प्रशासनाकडून बंद केले गेले आहेत. वरिष्ठांकडून सूचना आल्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया सायन रेल्वे स्थानकाचे प्रबंधक विजय काशीकर यांनी दिली.
दुहेरी नुकसान
अनेकदा लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना भूक व तहान लागल्यास स्थानकावर व्यवस्था नसते. एकीकडे प्रवाशांना सोय होत नाही, तर दुसरीकडे रेल्वेचा महसूल बुडत आहे. असे दुहेरी नुकसान होत आहे. यामुळे होणाऱ्या त्रासातून रेल्वे प्रशासनाने लवकरात-लवकर तोडगा काढावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.