भिवंडीतील जलवाहतुकीच्या कामांना वेग

भिवंडीतील जलवाहतुकीच्या कामांना वेग
Published on

भिवंडीतील जलवाहतुकीच्या कामांना वेग
कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने जेट्टींना निधी मंजूर
भिवंडी, ता. १८ (बातमीदार) : नागरिकांच्या जलद प्रवासासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सागरमाला अंतर्गत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जेट्टींच्या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. या निधीद्वारे होणाऱ्या कामाने काल्हेर, अंजूर दिवे, डोंबिवली, कल्याण येथील जेट्टींची कामे वेगाने होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचे खाडीतील प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी २०१४ पासून कल्याण ते भिवंडी-ठाणे मार्गे वसईपर्यंत जलवाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यातून इन लॅण्ड वॉटर ट्रान्सपोर्ट हा प्रकल्प साकारला होता. या विषयासंदर्भात केंद्रीय परिवहन मंत्रालयात जुलै २०१७ मध्ये बैठक झाली होती. या बैठकीत प्रकल्पाचा पहिला टप्पा मंजूर केला होता. त्यानुसार काल्हेर, अंजूर दिवे, कल्याण पश्चिममध्ये जेट्टी मंजूर होऊन या जेट्टीची कामे सुरू झाली होती.

१०० कोटींचा दुसरा हप्ता
गेल्या काही महिन्यांपासून या कामांना वेग आला आहे. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सागरमाला योजनेंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. त्यातून प्रवासी जलवाहतुकीसह रो-रो सेवेद्वारे माल वाहतुकीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के निधी दिला जाईल. त्यानुसार संपूर्ण कोकणातील ११ जेट्टी व टर्मिनल बांधण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने १०० कोटींचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे. या निर्णयाबद्दल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com