राज्यातील राजकीय परिस्थितीवर विचारमंथन
जव्हार (बातमीदार) : स्वातंत्र्यसैनिक रवींद्र ऊर्फ भाई वैद्य यांच्या जयंतीदिनी सोमवारी (ता. १७) शहरातील श्रीराम तीर्थ येथे अभिवादन करण्यासाठी कुटुंबीय व रवींद्र (भाई) वैद्य विचारमंचतर्फे व्याख्यानमाला आयोजित करून द्वितीय पुष्प गुंफण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित कवींनी आपल्या कविता सादर केल्या. व्याख्यानमालेत महाराष्ट्राचे राजकीय चित्र अस्थिर झालंय का, हा विषय ठरविण्यात आला होता. या विषयावर बोलताना राजकीय विश्लेषक आशीष जाधव यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विषय मांडताना अनोख्या शैलीत राजकीय मीमांसा, समाचार घेत अनेक उदाहरणे व संदर्भ देऊन श्रोत्यांना खिळवून ठेवले. माजी नगराध्यक्ष संदीप वैद्य यांनी त्यांचे वडील भाई वैद्य यांच्याविषयी काही किस्से सांगून आदिवासी आणि दुर्गम भागात येथील नागरिकांना न्याय देण्याकरिता कारागृह, तर गोवा मुक्ती संग्रामात सहभाग अशा अनेक आठवणी जागृत केल्या. या वेळी जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव पिंगळे, निरीक्षक किशोर मानभाव, जव्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम .आर. मेश्राम, सचिन शिंगडा आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

