शिवकालीन मर्दानी खेळ रंगणार

शिवकालीन मर्दानी खेळ रंगणार
Published on

खारघर, ता. १८ (बातमीदार) : शिवजयंतीनिमित्त खारघर वसाहतीत पारंपरिक वेशभूषांसह मिरवणूक, पालखी सोहळा, शिवकालीन मर्दानी खेळ, शिवचरित्रावर आधारित गीत गायन आणि महाआरोग्य शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी मराठा समाजाच्या वतीने बुधवारी सकाळी खारघरमधील महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. १० वाजता शिवज्योत आगमन होताच दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता पारंपरिक वेशभूषेसह ढोल, ताशा, लेझीम पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
खारघर शहर भाजपच्या वतीने सायंकाळी शिल्प चौकात शिवजयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे. या वेळी शिवचरित्रावर आधारित गायन व नृत्य कार्यक्रम होणार आहे. तसेच हळदी-कुंकू कार्यक्रम आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना आकर्षक साडी भेट देण्यात येणार आहे. या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहतील. शिवजयंती सोहळ्यात सकाळी जन्मोत्सव व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यावर लाठीकाठीचे प्रात्‍यक्षिक, शिवकालीन मर्दानी खेळ, रक्तदान शिबिर आणि शिवभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच ठाकरे गटाकडून घरकुल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com