जेसीबीच्या धक्क्याने गॅसवाहिनी फुटली

जेसीबीच्या धक्क्याने गॅसवाहिनी फुटली
Published on

जेसीबीच्या धक्क्याने गॅसवाहिनी फुटली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्याने महानगर गॅसवाहिनी फुटली. त्यामुळे गॅस गळती झाल्याची घटना मंगळवारी (ता. १८) सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका येथे समोर आली. या घटनेचा फटका त्या वाहिनीवरील ५० ग्राहकांना दुपारी दोन वाजेपर्यंत बसला.
वाघबीळ नाका येथे जेसीबीचा धक्का लागून गॅसवाहिनीला गळती सुरू झाल्याची माहिती सागर घोलप यांनी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महानगर गॅस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच त्या गॅस वाहिनीचा मुख्य वॉल्व बंद केल्यानंतर दुरुस्तीचे काम महानगर गॅस कर्मचाऱ्यांनी हाती घेतले. याचदरम्यान गॅस वाहिनीवरील वाघबीळ नाका परिसरातील सुमारे ५० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com