

नेरूळमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त वॉकेथॉन
सातशेपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला सहभाग
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : अपघातांचे वाढते प्रमाण पाहता अपोलो रुग्णालयाच्या वतीने नेरूळ जिमखान्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह जागरूकता वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, अपघात रोखण्यासाठी तसेच नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने व सुरक्षितपणे वाहन चालवणे गरजेचे आहे, असा संदेश या वॉकेथॉनमधून देण्यात आला. या वॉकेथॉनमध्ये नागरिकांसह, डॉक्टर्स आणि पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नेरूळ जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या वॉकेथॉनची सुरुवात झुम्बा आणि वॉर्मअपने झाली. त्यानंतर वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी एकत्र येऊन १०६६ साठी एक मानवी साखळी तयार केली. बायकर्स, सायकल चालक, फिटनेस प्रेमी अशा वेगवेगळ्या समूहातील लोकांनी रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देणाऱ्या संदेशाचे फलक दर्शवत वॉकथॉन पूर्ण केले. या वॉकेथॉनमध्ये अपोलो रुग्णालयाच्या मेडिकल टीम्सने ॲम्बुलन्स ब्रिगेडचे नेतृत्व केले. या वॉकेथॉनमध्ये सहभागी होऊन ते पूर्ण करणाऱ्या सर्वांचा पदक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आज प्रत्येक पाऊल जीव वाचवण्याच्या दिशेने उचललेले पुढचे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा जागरूकता नियमांचे पालन करण्यापुरती मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाने जबाबदारीच्या भावनेतून चांगल्या सवयी अंगिकारणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. अपोलो रुग्णालयाच्या पश्चिम क्षेत्राचे रिजनल डायरेक्टर डॉ. नितीन जगासिया यांनी रस्त्यांवरील अपघातांमध्ये तत्काळ मेडिकल सेवा मिळाल्यास जीवन आणि मृत्यू दरम्यानचे अंतर वाढवता येणे शक्य आहे. या वॉकेथॉनमार्फत जागरूकता निर्माण करून सुरक्षित रस्त्यांचे महत्त्व आणि प्रत्येक घराने आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज असणे आवश्यक असल्याचा संदेश दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.