स्वरयंत्रातील नसांवर (व्होकल कॉर्ड) यशस्वीपणे शस्त्रक्रिया
आयटी तरुणीचा आवाज मिळाला परत
स्वरयंत्रातील नसांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया
वाशी, ता. १८ (वार्ताहर) : खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये डॉ. फरहा नाझ काझी आणि डॉ. दीपक खन्ना यांनी एका २४ वर्षीय आयटी तरुणीच्या स्वरयंत्रातील नसांवर (व्होकल कॉर्ड) यशस्वीपणे शस्त्रक्रिया केल्याने तिला आवाज परत मिळाला आहे.
अविका सक्सेना (नाव बदललेले) या तरुणीला दोन वर्षांपासून आवाजाचा त्रास होत होता. मज्जातंतूला झालेल्या दुखापतीमुळे तरुणीला तिचा आवाज गमवावा लागला होता. अनेक उपचार निरर्थक गेल्यानंतर मेडिकवरमध्ये केलेल्या तपासणीत तरुणीला डाव्या स्वरयंत्राचा पक्षाघात (व्होकल फोल्ड पॅरालिसिस) असल्याचे निदान झाले होते. यानंतर डॉक्टरांकडून लॉरिन्जियल रिइनर्व्हेशन या आधुनिक शस्त्रक्रियेद्वारे तरुणीच्या स्वरयंत्राच्या नसा पुन्हा यशस्वीपणे जोडण्यात आल्या. यामुळे तरुणीला तिचा आवाज परत मिळाला. या प्रक्रियेला नॉन-सिलेक्टिव्ह लॉरिन्जियल रिइनर्व्हेशन प्रक्रिया असे म्हणतात. अशा प्रकारची शस्त्रक्रिया ही शहरातील पहिलीच असल्याचा दावा हॉस्पिटलकडून करण्यात आला आहे. ही शस्त्रक्रिया पारंपरिक उपचारांपेक्षा जास्त फायदेशीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. केवळ तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर अविका दोन दिवसांत घरी गेली आणि आता ती स्पष्ट बोलू शकत आहे.
....................
नॉन-सिलेक्टिव्ह लॉरिन्जियल रिइनर्व्हेशन प्रक्रिया ही स्वरयंत्राच्या (व्हॉइस बॉक्स) समस्यांवर उपचार करण्यासाठी एक नवीन शस्त्रक्रिया पद्धती आहे. या प्रक्रियेत क्षतिग्रस्त झालेल्या नसांना नवीन आरोग्यदायी नसा जोडल्या जातात, ज्यामुळे स्वरयंत्राची कार्यप्रणाली सुधारते. काही वेळा नसांच्या नुकसानीमुळे व्हॉइस बॉक्सची गतिशीलता कमी होते. यामुळे आवाज कमजोर किंवा कर्कश होतो. ही प्रक्रिया व्हॉइस बॉक्सला पुन्हा सक्रिय करून त्याची गतिशीलता सुधारते. तर काही रुग्णांचे व्हॉइस बॉक्स नीट उघडत नसल्याने श्वास घेण्यास त्रास होतो, अशा रुग्णांमध्ये या शस्त्रक्रियेमुळे व्हॉइस बॉक्सच्या स्नायूंची ताकद वाढते आणि श्वास घेणे सोपे होते.
...................
पारंपरिक प्रक्रियेच्या तुलनेत ही आधुनिक उपचार पद्धती नक्कीच फायदेशीर ठरते आहे. बायलॅटरल व्होकल फोल्ड पॅरालिसिस किंवा मज्जातंतूचे गंभीर नुकसान झालेल्या रुग्णांनादेखील या प्रक्रियेचा फायदा होतो आहे. आवाजाच्या विकारांशी झुंजणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया आशेचा किरण ठरत असून, आवाज पुन्हा मिळविण्यासाठी ही प्रक्रिया प्रभावी ठरत आहे.
- डॉ. फरहा नाझ काझी, लॅरिन्गोलॉजिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल, खारघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

