बारावीच्या तोतया विद्यार्थ्याला अटक
बारावीच्या तोतया विद्यार्थ्याला अटक
अंबरनाथच्या ‘शहरप्रमुखा’साठीचा डमी
बोळिंज, ता. १८ (बातमीदार) ः बारावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका तोतया विद्यार्थ्याला पेल्हार पोलिसांनी अटक केली. अहमद खान असे त्याचे नाव आहे. नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील एका परीक्षा केंद्रात हा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ज्या अरबाज कुरेशी या विद्यार्थ्यासाठी तो परीक्षा देण्यासाठी आला होता तो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या विद्यार्थी सेनेचा अंबरनाथ शहरप्रमुख आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. सोमवारी भौतिकशास्त्र विषयाचा पेपर होता. अंबरनाथ शहरातील काही तोतया विद्यार्थी नालासोपारा येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी येत असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी त्यांनी संशयित विद्यार्थ्याचा पाठलाग केला. हा विद्यार्थी पेल्हार येथील ओम साई छाया ज्युनियर कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर आला. कार्यकर्त्यांनी त्याची माहिती केंद्रप्रमुखांना दिली. हा तरुण तोतया असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे नाव अहमद खान असून, तो अरबाज कुरेशी या विद्यार्थ्यांचा पेपर सोडविण्यासाठी आला होता. याबाबत पेल्हार पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अहमद खान याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पेल्हार पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप राख यांनी दिली. अरबाज खान हा मूळ विद्यार्थी अंबरनाथ येथील आहे. विशेष म्हणजे तो अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे. अनेक तरुण अशा प्रकारे तोतया विद्यार्थी बनून परीक्षा देण्यासाठी आले आहेत, असा आरोप मनसेने केला आहे. आमच्या हाती एक तरुण लागला बाकी दोन जणांनी पळ काढला, अशी माहिती मनसेच्या नालासोपारा येथील सागर कुरडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

