शौचालयाच्या टाकीत आढळला बेपत्ता चिमुरड्याचा मृतदेह
शौचालयाच्या टाकीत आढळला बेपत्ता चिमुरड्याचा मृतदेह
भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) ः भिवंडी शहरातील भादवड येथील एका इमारतीत राहणाऱ्या अडीच वर्षीय बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह घराशेजारीच काही अंतरावर असलेल्या शौचालयाच्या टाकीत आढळून आला. आयांश अमरजीत जयस्वाल असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयांश शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी साडेचार वाजता घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाला होता. त्याचा परिसरात शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच परिसरात स्थानिक कुटुंबीयांसह पोलिसांकडून शोध घेतला जात असताना तो कुठेही आढळून आला नव्हता. मंगळवारी (ता. १७) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आयांश राहत असलेल्या इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या शौचालयाच्या उघड्या चेंबरच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी बालकाचा मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

