पोलिस ठाण्यासमोर कोयत्याने हल्ला
पोलिस ठाण्यासमोर कोयत्याने हल्ला
कर्जतमध्ये तिघे जखमी
कर्जत, ता. १८ (बातमीदार) ः कर्जत शहरातील मध्यवर्ती भागात पोलिस ठाण्यासमोरच सोमवारी (ता. १७) रात्री १०.३० वाजता दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. वाद इतका विकोपाला गेला की कोयत्यांचा वापर करण्यात आला आणि यात तीन तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना कडावमधील वडवली गावात घडली.
पहिल्या तक्रारीनुसार, हरड आणि पवार यांच्यात एका रस्त्याच्या वापराबाबत मतभेद होते. संध्याकाळी सात वाजता कैलास पवार आणि त्यांचे चुलत भाऊ वैभव पवार यांनी विकास हरड यांच्या घरासमोर जाऊन कठडा तोडण्याची मागणी केली. यावरून वाद सुरू झाला. परस्परविरोधी तक्रारी देण्यासाठी ते रात्री ९.३० च्या सुमारास पोलिस ठाण्यात आले असता तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेथे कोयत्यांचा वापर करण्यात आला. कैलास पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहन मराडे, रोशन मराडे, प्रथम मराडे आणि हितेश घुडे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात रोशन मराडे, मोहन मराडे आणि प्रथम मराडे जखमी झाले आहेत. मोहन मराडे यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना पुढील उपचारांसाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दुसऱ्या तक्रारीनुसार, विकास हरड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय भवनाजवळ लाठाकाठ्यांनी हल्ला केला. यात कैलास पवार, त्यांची आई सुरेखा पवार, मनोज पवार आणि वैभव पवार जखमी झाले आहेत. या प्रकरणात कर्जत पोलिसांनी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारींची नोंद घेतली. रात्री उशिरा याबाबत परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद झाली असून, पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी आज सकाळी कर्जत पोलिस ठाण्यात भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

