पनवेल पोलिस ठाण्याचे नवीन वास्तूत स्थलांतर

पनवेल पोलिस ठाण्याचे नवीन वास्तूत स्थलांतर

Published on

पनवेल पोलिस ठाण्याचे नवीन वास्तूत स्थलांतर
नवीन इमारतीची पोलिस उपआयुक्तांकडून पाहणी
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बहुप्रतीक्षित प्रशासकीय भवनच्या इमारतीमध्ये असलेले पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीची पाहणी पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी केली. या ठिकाणी पोलिस मुख्यालय लवकरच स्थलांतर होणार असल्याचे उपायुक्तांनी सांगितले.
पनवेल शहरात येणाऱ्या शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची सोय व्हावी म्हणून सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्याचे काम गेल्या दहा वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. ते काम पूर्ण होऊन प्रशासकीय भवन पूर्णत्वास आले आहे. याच इमारतीच्या मूळ जागी पनवेल शहर पोलिस ठाणे होते, त्या जागी प्रशासकीय भवन बांधण्यात आले आहे. यामध्ये पनवेल शहर पोलिस ठाण्यासाठी प्रशस्त जागा ठेवण्यात आली आहे. पनवेल शहर पोलिस ठाणे सध्या भाड्याच्या जागेत आहे. सध्या प्रशासकी इमारतीचे काम पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी अपर तहसीलदार कार्यालयासह इतर सरकारी विभागाचे कामकाज सुरू होणार आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील २० प्रशस्त खोल्या पोलिस ठाण्यासाठी देण्यात येणार आहेत. यामध्ये दोन पोलिस कोठडी, कॅन्टीन, स्वच्छतागृह अशा सर्व सोयीसुविधा इमारतीच्या तळमजल्यावर पोलिसांसाठी उपलब्ध आहेत. मागील अनेक वर्षे शहर पोलिस ठाण्याचा कारभार भाड्याच्‍या जागेतून सुरू होता. अखेर पोलिस उपायुक्त मोहिते यांच्यासमवेत पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी इमारतीची पाहणी केली. प्रत्येक प्रशस्त खोलीत जाऊन पोलिस उपायुक्त मोहिते यांनी इमारतीचा आढावा घेतला.
.....................
आम्ही नुकतेच पनवेलमधील प्रशासकीय भवनातील पोलिस ठाण्याच्या जागेची पाहणी केली. त्या अनुषंगाने पोलिस ठाण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांसोबत चर्चा केली. जुन्या जागेपेक्षा ही जागा प्रशस्त व वाहनतळाची सुविधा असल्यामुळे पोलिस स्थानकात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही. लवकरच या ठिकाणाहून शहर पोलिस ठाण्याचा कारभार सुरू होईल.
-प्रशांत मोहिते, उपायुक्त, परिमंडळ दोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com