कवी संमेलनातून लुटला गझलाचा आनंद

कवी संमेलनातून लुटला गझलाचा आनंद

Published on

कविसंमेलनातून लुटला गझलांचा आनंद
उरण, ता. १८ (वार्ताहर) ः शहरातील विमला तलाव येथे दर महिन्याच्या १७ तारखेला कोकण मराठी साहित्य परिषदेकडून मधुबन कट्ट्याचे कविसंमेलन घेण्यात येते. या महिन्याच्या १७ तारखेला ११२वे कविसंमेलन भुवनेश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गझलकार आप्पा ठाकूर यांच्‍या गझलांचा श्रोत्यांनी आनंद लुटला.
या कार्यक्रमात उरणातील सुप्रसिद्ध नाट्यकलाकार यशवंत तांडेल, पांडुरंग घरत आणि शिक्षक संजीव पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन तृप्ती भोईर आणि आप्पा ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील, मधुबन कट्टा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, सूर्यकांत दांडेकर, नीळवर्ण दत्ताराम, रमाकांत म्हात्रे, अरविंद घरत, सुभाष मुकादम, सुरेश भोईर, नरेश ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमातील कविसंमेलनात मच्छिंद्र म्हात्रे, संजय होळकर, अजय शिवकर, शिवप्रताप पंडित, तृप्ती भोईर, हेमंत पाटील, अनुप शिवकर, अनामिका राम, तेजस्विनी शर्मा, भालचंद्र म्हात्रे, संग्राम तोगरे, रामचंद्र म्हात्रे, मारुती तांबे आदी कवींनी श्रोत्यांना मनमुराद आनंद दिला. जीवनाला वास्तव रूप देणे आम्हा कवींना आवडते. येथे ज्या कविता सादर केल्या आहेत, त्यावरून १७ तारखेला उरणला बहर येतो, असे कवींनी विचार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com