

ठाण्यातील रिफ्लेक्टर चमकेनात
ठाणे शहर, ता. १८ (बातमीदार) : वाहतूक विभागाने ठाणे शहरातील रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगजवळ रिफ्लेक्टर बसवले आहेत; मात्र बसवलेले रिफ्लेक्टर रात्रीच्या वेळी चमकत नसल्याने वाहनचालकांना रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग दिसणे कठीण झाले आहे. परिणामी अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे. ठाण्यातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीट झाले असल्याने वाहनांची गती वाढली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण होत आहे, असे होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेकडून झेब्रा क्रॉसिंग तयार केले आहे. रात्रीच्या वेळी हे झेब्रा क्रॉसिंग अधिक स्पष्ट दिसावेत, यासाठी एमएसआरडीसीकडून येथे रिफ्लेक्टर बसवले आहेत. हे रिफ्लेक्टर रात्रीच्या वेळी दिव्याप्रमाणे चमकतात. त्यामुळे वाहनचालकांना पुढे गतिरोधक असल्याचे लक्षात येते, परंतु ठाण्यात बसवलेले रिफ्लेक्टर चमकत नसल्याने त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.