

आव्हाडांचे शिलेदार अजित पवार गटात
ठाणे, ता. १८ : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय साहाय्यक अभिजित पवार व कट्टर समर्थक हेमंत वाणी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे जितेंद्र आव्हाड यांना धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतरही ठाण्यात अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी आव्हाड यांची साथ सोडली नव्हती. अभिजित यांच्या जडणघडणीमध्ये आव्हाड यांचा मोठा वाटा आहे. येत्या काळात आव्हाड यांचे अन्य काही पदाधिकारीसुद्धा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या वेळी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला, शहर अध्यक्ष आनंद परांजपे हेदेखील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.