उल्हासनगर स्थानक परिसरात दहशत!

उल्हासनगर स्थानक परिसरात दहशत!
Published on

चाकू दाखवत दहशत
पसरविण्याचा प्रयत्न
उल्हासनगर, ता. १८ ( वार्ताहर) : उल्हासनगर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या एका मोबाईल दुकानाची तोडफोड करीत दुकानदाराला चाकूचा धाक दाखवित जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पाजी नामक आरोपीविरोधात विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार मोहम्मद शाहिद झाकीर हुसेन (वय २५) याचे उल्हासनगर रेल्वे स्थानकानजीक मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाजी नामक एका व्यक्तीने दुकानात येत वाद घालण्यास सुरुवात केली. तक्रारदाराचा लहान भाऊ तौकीर (वय २२) याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने चाकू दाखवित जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दुकानातील प्रिंटर मशीनची तोडफोड करीत घटनास्थळावरून पसार झाला. झाकीर हुसेन याच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com