प्राध्यापिकेकडून दोन कोटी उकळले
प्राध्यापिकेकडून दोन कोटी उकळले
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : प्राप्तिकर विभागातील अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने नेरूळमध्ये राहणाऱ्या ५८ वर्षीय प्राध्यापिकेला टॅक्स चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. नंतर सर्व संपत्ती आरबीआयकडून व्हेरिफाय करून परत देण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ८१ लाख ७२ हजार रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या प्राध्यापिका एका सुप्रसिद्ध महाविद्यालयात कार्यरत आहेत. १४ जानेवारीला टोळीतील एका सदस्याने त्यांना संपर्क साधला होता. तसेच त्यांच्या नावे दिल्ली येथे असलेल्या ग्लोबल ट्रेडिंग या कंपनीचा आठ लाख ६२ हजार रुपयांचा टॅक्स भरणे बाकी असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या नावे कोणतीही कंपनी नसल्याचे व त्यांच्या ओळखपत्राचा गैरवापर करून कुणीतरी ही कंपनी बनवली असावी, अशी शक्यता प्राध्यापिकेने व्यक्त केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना दिल्ली येथे जाऊन पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. दिल्ली येथे जाणे शक्य नसल्याचे प्राध्यापिकेने सांगितल्यानंतर कॉल दिल्ली पोलिसांकडे देत असल्याचे भासवून मनी लाँड्रिंग केसची भीती दाखवून त्यांना घाबरवले आणि मग तीन बँक खात्यांत असलेली तब्बल एक कोटी ८१ लाख ७२ हजारांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर मागून घेऊन फसवणूक केली. नंतर आणखी २२ लाख रुपये पाठवण्यास प्राध्यापिकेला सांगितले. तेव्हा त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले आणि १६ फेब्रुवारीला सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

