आदिवासी बांधवांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण
आदिवासीबांधवांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण
तहसीलदार अमित पुरी यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित
अंबरनाथ ता. १९ (वार्ताहर) : आदिवासी शेतजमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा प्रकार आदिम कातकरी संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव सुनील वाघ यांनी उघडकीस आणला होता. यासंदर्भात आदिवासीबांधवांनी १० दिवसांची पालिकेला मुदत दिली होती, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, पालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने आदिवासीबांधवांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले; मात्र तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.
अंबरनाथ तालुक्यातील मोरवली गट ४७ परिसरातील आदिवासी शेतजमिनीवर काही जणांनी अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा आरोप आदिवासीबांधवांनी केला. ही जमीन आदिवासीबांधवांच्या मालकीची आहे. यासंदर्भात गेल्या वर्षभरापासून आदिवासी पाठपुरावा करत आहेत; मात्र पालिका प्रशासन त्यांच्या या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी साधे प्रयत्नसुद्धा करत नसल्याचे आरोप आदिम कातकरी संघटनेकडून करण्यात आले.
१० दिवसांपूर्वीच आदिम कातकरी संघटनेच्या वतीने अंबरनाथ नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. तसेच आदिम संघटनेमार्फत १० दिवसांची मुदत देण्यात आली होती, मात्र पालिका प्रशासन आदिवासी समाजाच्या मागणीकडे कानाडोळा करत आहे. तसेच कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून आल्याने सुमारे १०० आदिवासीबांधव भरउन्हात तहसील कार्यलयासमोर (ता.१८) उपोषणाला बसले होते. तसेच आदिवासी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. दरम्यान, तहसीलदार अमित पुरी यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण रात्री उशिरा स्थगित केले आहे.
अहवालानुसार कारवाई
मोरवली गट ४७ येथे माझ्यासह आदिवासीबांधवांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीवर काही समाजकंटकांनी अतिक्रमण करून बांधकाम केले. आम्ही हे अतिक्रमण हटवण्यासाठी अनेकदा पालिकेकडे पाठपुरावा केला; मात्र पालिकेने योग्य कारवाई केली नसल्याने बाधित आदिवासीबांधवांनी पारंपरिक वेशभूषेत उपोषण केल्याचे ठाणे जिल्हा सचिव सुनील वाघ यांनी सांगितले. अंबरनाथ तालुक्यातील मोरवली सर्व्हे ४७ ची स्थळपाहणी, पंचनामा करून हा अहवाल अंबरनाथ मंडळ अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. दरम्यान, मंडळ अधिकारी यांच्या सविस्तर अहवालानुसार नियमोचीत कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार अमित पुरी यांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

