खारघर वसाहतीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

खारघर वसाहतीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
Published on

खारघर वसाहतीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
आवाजामुळे झोपमोड होत असल्याने नागरिक संतप्त
खारघर, ता. १९ (बातमीदार) : खारघर परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. जलवायू विहार सोसायटीत रात्री-अपरात्री कुत्रे दंगामस्ती करून नागरिकांची झोपमोड करीत आहेत. त्‍यामुळे या कुत्र्यांचा नागरिकांनी बंदोबस्‍त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
खारघर वसाहतीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील मुख्य रस्‍ते, गल्‍ल्‍यांमध्ये जथ्थ्याने फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली आहे, मात्र तरीही कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे.
खारघरमधील जलवायू विहार सोसायटीत ६५० फ्लॅट आहेत. या सोसायटीत जवळपास चाळीसहून अधिक मोकाट कुत्र्यांनी सोसायटीचा ताबा घेतला आहे. कुत्र्यांनी वृद्ध व्यक्तींना चावा घेतल्‍याच्या घटना घडल्‍याचे रहिवाशांनी सांगितले.


जलवायू विहार फेज एक सोसायटीत ४० हून अधिक मोकाट कुत्रे आहेत. रात्री-अपरात्री कुत्र्यांच्या आवाजामुळे रहिवाशांची झोप उडाली आहे. याविषयी पालिका आयुक्तांची भेट घेऊन उपाययोजना करण्यास सांगितले, मात्र काही झाले नाही. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी मंत्रालय गाठणार आहे.
- सुमन भिडू ,
रहिवासी जलवायू विहार सोसायटी

खारघर परिसरात नियमितपणे मोकाट कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांनी सोसायटीत प्रवेश केल्यास प्रवेश नाकारला जात आहे. रहिवाशांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
- डॉ. बी. एन. गिते,
श्वान निर्बीजीकरण विभाग पनवेल महापालिका

चौकट
सकाळ-संध्याकाळी सर्वच रस्‍त्‍यांवर कुत्र्यांची गर्दी दिसून येते. खारघर परिसरातील चिकन बिर्याणी, रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या चायनीज हातगाडीवाले टाकाऊ खाद्यपदार्थ रस्त्यालगत असलेल्या नाल्यात टाकून पसार होतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com