फंडासह कर्जाच्या आमिषाने पावणेदोन कोटीची फसवणूक

फंडासह कर्जाच्या आमिषाने पावणेदोन कोटीची फसवणूक
Published on

फंडासह कर्जाच्या आमिषाने पावणेदोन कोटींची फसवणूक
बोरिवलीतील घटना; क्रेडिट सोसायटीच्या संचालिकेला अटक
अंधेरी, ता. १९ (बातमीदार) : फंडासह कर्जाच्या आमिषाने दोन व्यक्तींची सुमारे पावणेदोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गजानन सहकारी क्रेडिट सोसायटीच्या संचालिका रजनी राजन देशपांडे यांना शनिवारी बोरिवली पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या गुन्ह्यात त्या सध्या पोलिस कोठडीत आहेत. या गुन्ह्यांमध्ये चौदा जणांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये जितेंद्र कोकरेजा, सुशीम गायकवाड, पोपट मुळे, निकम पाटील, मोहम्मद अजीज, जयश्री भोज, अमित मेहता, सुर्वण बरेकर, भारत बाबू रंगारे, आनंद स्वामी आणि इतर चौघांचा समावेश आहे. यामधील चाळीस वर्षांचे तक्रारदार मूळचे सोलापूरचे रहिवासी आहेत. त्यांच्या संस्थेच्या शाळेच्या बांधकामासाठी फंडाची गरज होती. त्या वेळी संबंधित आरोपीशी ओळख झाली. या ओळखीनंतर त्यांनी त्यांच्या गजानन सहकारी क्रेडिट सोसायटीतून ३० कोटींचा फंड देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच त्यांच्या परिचित मित्राला घरासह कार्यालयाच्या बांधकामासाठी चार कोटींचे कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र या कामासाठी त्यांनी त्यांच्यासह मित्रांकडून प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी पावणेदोन कोटी रुपये घेतले. दिलेल्या मुदतीत त्यांना फंड किंवा कर्ज दिले नाही. विविध कारण सांगून ते सर्वजण त्यांना टाळण्याचा प्रयत्न करीत होते.
या प्रकरणात त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसांत सर्व आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत क्रेडिट सोसायटीच्या संचालिका रजनी देशपांडे यांची पोलिसांनी चौकशी केली होती. या चौकशीनंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. या संपूर्ण घोटाळ्यात त्यांचा सहभाग उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com