

किकबॉक्सिंग स्पर्धेत निसर्गला कांस्यपदक
अंबरनाथ ता. १९ (वार्ताहर) : नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात चौथ्या वाको इंडिया ओपन इंटरनॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेत अंबरनाथमधील निसर्ग गोडबोले यांनी कांस्यपदकाची कमाई केली आहे. ही स्पर्धा १ ते ५ फेब्रुवारीदरम्यान पार पडली होती. या स्पर्धेनंतर शहरात परत आलेल्या निसर्गचे ढोल-ताशांच्या गजरात रविवारी (ता. १६) जंगी स्वागत करण्यात आले. त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
चौथ्या वाको इंडिया ओपन इंटरनॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेत स्पर्धेत २२ देशांतील दोन हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. युके, आयर्लंड, जर्मनी, क्रोएशिया, एस्टोनिया, ऑस्ट्रेलिया, युएई, फिनलंड, कझाकस्तान, रशिया आणि स्वित्झर्लंड येथील खेळाडूंनी ज्युनियर, सब-ज्युनियर आणि सीनियर श्रेणीत आपले कौशल्य दाखविले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निसर्ग गोडबोले यांने उत्कृष्ट खेळ करत कांस्यपदक पटकावले. निसर्गने यापूर्वी मुंबई डिस्ट्रिक्ट किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२ मध्ये ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक, मुंबई डिस्ट्रिक्ट किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्णपदक, किक बॉक्सिंग मुबंई चषक चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्णपदक, तसेच स्टेट फेडरेशन कप २०२४ मध्ये रौप्यपदक पटकावले आहे.
निसर्गने आपल्या यशाचे श्रेय गुरुजन व आई-वडिलांना दिले. तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगितले. तसेच या वेळी अंबरनाथमध्ये स्थानिक खेळाडूंना पुरेशा संधी आणि सुविधा मिळत नाहीत, ही खंत रहिवाशांनी व्यक्त केली. अंबरनाथमध्ये पुरेशी क्रीडा प्रशिक्षण केंद्र नसल्यामुळे खेळाडूंना इतर शहरांत जाऊन सराव करावा लागत असल्याची खंत माजी नगरसेवक उमेश गुंजाळ यांनी व्यक्त केली. आमच्या मुलाने खूप मेहनत घेतली असून, अभिमानास्पद काम केल्याने खूप गर्व होत असल्याची भावना वडील दिलीप गोडबोले यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.