

गेस्ट हाउसमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
मॅनेजरसह दोघांना अटक; अल्पवयीन मुलीची सुटका
अंधेरी, ता. १९ (बातमीदार) : गेस्ट हाउसमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा सहार पोलिसांनी पर्दाफाश करून गेस्ट हाउसच्या मॅनेजरसह मदतनीस अशा दोघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
अंधेरीतील मरोळ नाका येथे एक गेस्ट हाउस असून तिथे सलमान हा मॅनेजर तर जबरूल हा मदतनीस आहे. ते दोघेही आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या तरुणींना गेस्ट हाउसमध्ये परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करून तिथे सेक्स रॅकेट चालवत होते. ही माहिती मिळताच त्याची सहार पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली. त्यामध्ये तथ्य असल्याचे आढळून येताच याच पथकाने मरोळ नाका परिसरात छापा टाकला. या छाप्यात सलमान आणि जबरूल या दोघांनाही पोलिसांनी अटक केली तसेच त्यांच्या तावडीतून १७ वर्षांच्या मुलीची सुटका केली. तिच्या चौकशीतून ते दोघेही तिला काही ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याचे तिने सांगितले. ग्राहकांकडून मिळालेली काही रक्कम ते दोघेही तिला देत होते, तर उर्वरित रक्कम ते दोघे जण घेत होते. या कबुलीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता. यानंतर मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.