अपील करा पण एका मर्यादेपर्यंत: खासदार सुनील तटकरे

अपील करा पण एका मर्यादेपर्यंत: खासदार सुनील तटकरे
Published on

अपील करा, पण एका मर्यादेपर्यंत: खासदार सुनील तटकरे
माणगाव, ता. १९ (बातमीदार) ः क्रिकेट हा चतुरस्त्र सांघिक खेळ आहे. आम्ही लहानपणापासून क्रिकेटवर प्रेम करतो. अलीकडच्या कालावधीतील क्रिकेटमधील गुणवैशिष्ट्य सर्वांनी शिकणे आवश्यक आहे. क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू पायचीत झाला की, मोठ्या प्रमाणात अपील केली जाते. पंच हे शिस्तबद्ध असतात. स्लो मोशनमध्ये लक्षात येते की, आरडाओरडा करणाऱ्यांपेक्षा निर्णय देणारा पंच अतिशय योग्य असतो. म्हणून पंचाचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे अपील करा, पण एका मर्यादेपर्यंत. क्रिकेट हा खेळ संघभावना व जिंकायचं कसं ते शिकवतो. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे टीम स्पिरीट तयार झालंय त्यात अनेक जण असून, मीसुद्धा त्यातला एक आहे, अशी चौफेर फटकेबाजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू चेअरमन खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथे पार पडलेल्या नामदार आदिती चषक उद्घाटन समारंभावेळी केली.
दिल दोस्ती दुनियादारी व माणगाव शहर असोसिएशनतर्फे नामदार आदिती चषक २०२५ स्पर्धा माणगाव शहरातील धनसे मैदान १५ ते १६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. भारतीय सुप्रसिद्ध क्रिकेटपटू चेन्नई सुपर किंग्ज कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्या हस्ते खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार पडले. या वेळी खासदार तटकरे पुढे म्हणाले की, एकेकाळी मीसुद्धा अंतरमहाविद्यालयीन क्रिकेट खेळाडू होतो. १९७१ रोजी अजित वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट इंडीजमध्ये भारताने मालिका खेळली. तोपर्यंत वेस्ट इंडीजमध्ये मालिका जिंकली नव्हती. तेव्हा सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा एकमेव खेळाडू सुनील गावसकर. त्या वेळी लेग टॅप हा शब्द नव्याने आला. तेव्हा भारताला देदीप्यमान यश मिळाले. त्यानंतर भारतीय संघानेसुद्धा अभूतपूर्ण यश प्राप्त केले. जेव्हा आयपीएल सामने आले, तेव्हा महेंद्रसिंग धोनी त्याचे केस व त्याची विकेट कीपिंग ही पराकोटीच्या लोकप्रियतेला पोहोचली. मग धोनी भारतीय संघाचा कॅप्टन झाला. कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख सर्वत्र पसरली. कूल राहणे हे महत्त्वाचे आहे. कॅप्टन जर कूल असेल, तर त्याला यश आपोआप प्राप्त होते. जर कॅप्टन भडक असेल, तर सर्व खेळाडूसुद्धा भडक डोक्याचे असतात. मग त्या सामन्याचे वाटोळे होते. त्यानंतर दुसरा कॅप्टन कूल कोण असेल, तर तो ऋतुराज गायकवाड. मैदानातील क्रिकेट हे संपूर्ण आयुष्य कसे जगायचे, हे शिकवते, असे या वेळी खासदार तटकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com