तुंबलेल्या गटारामुळे कर्जतवासी त्रस्‍त

तुंबलेल्या गटारामुळे कर्जतवासी त्रस्‍त

Published on

तुंबलेल्या गटारामुळे कर्जतवासी त्रस्‍त
ठेकेदाराकडून कामात तांत्रिक दोष; परिसरात दुर्गंधीसह अस्‍वच्‍छता
कर्जत, ता. १९ (बातमीदार) ः कर्जत नगर परिषद हद्दीतील धापया महाराज देवस्थान परिसरातील गटाराचे काम दीड वर्षापासून अर्धवट स्थितीत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. विशेष म्‍हणजे कामात झालेल्या चुकीमुळे मच्छी गल्लीपासून पुढील भागात गटाराचे पाणी तुंबत आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे.
२०१९ रोजी कर्जत नगर परिषदेकडून गटाराच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले होते, तर दोन वर्षांनी दुसरा टप्पा करण्यात आला, मात्र या दोन्ही टप्प्यात समन्वयाचा अभाव असल्याने गटाराची उंची जवळपास एक ते दीड फूट खाली गेली आहे. परिणामी, मागील भागातील सांडपाणी गटारात अडकल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. धापया महाराज देवस्थान परिसरात अस्वच्छतेमुळे श्रद्धाळू भाविक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. काही भाविकांच्या मते, गटारातील झिरपणारे पाणी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचत आहे. ज्यामुळे श्रद्धेला तडा जात आहे. धापया महाराज देवस्थान परिसर हा कर्जत शहरातील महत्त्वाचा भाग असून, येथे रोज हजारो नागरिक, शाळकरी मुले आणि भाविक ये-जा करतात, मात्र गटार आणि रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे विशेषतः पावसाळ्यात चिखल, तर सध्या धूळ आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या तरीही नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे, शिवाय लाखो-कोटी रुपयांचे टेंडर काढूनही जर ठेकेदार काम पूर्ण करत नसतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकून हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. जर त्वरित कारवाई झाली नाही, तर जनआंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
.............
चौकट
गटाराचे काम दोन टप्प्यात केल्याने ठेकेदाराकडून गटारांची उंची कमी झाल्याने सांडपाणी पुढे वाहून जात नसेल. याबाबत तांत्रिक अडचणी शोधून लवकरच योग्य बांधकाम केले जाईल.
मनीष गायकवाड, नगर अभियंता.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com