डॉ.अशोक येंडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलवर नियुक्त

डॉ.अशोक येंडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलवर नियुक्त

Published on

सर्वोच्च न्यायालयाच्या ''या'' पॅनलवर डॉ. अशोक येंडे
विवेक पंडित यांनी केले अभिनंदन
विरार, ता. १९ (बातमीदार) : अर्थसंकल्पावर काम करणाऱ्या समर्थन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. (डॉ.) अशोक येंडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या विधी व सेवा समितीच्या अधीन असलेल्या मध्यस्थी केंद्राच्या पॅनलवर मध्यस्थ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विधी व सेवा समितीचे अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींद्वारे त्यांची नियुक्ती झाली आहे. एका संवेदनशील आणि वंचित घटकांच्या वेदनांची जाणीव असणाऱ्या व्यक्तीची ही नियुक्ती असून, न्याय प्रक्रियेत अन्यायग्रस्त दुर्बल घटकाचे योग्य प्रतिनिधित्व डॉ. अशोक येंडे करतील, अशा शब्दांत समर्थन आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा सामरिक अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी डॉ. अशोक येंडे यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com