शिवकालीन शस्त्र प्रदर्शनात इतिहास प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवकालीन शस्त्र प्रदर्शनात इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभादेवी, ता. १९ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभादेवी येथे भरविण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्र संग्रह प्रदर्शनातून त्याकाळी वापरलेले शस्त्र, नाणी तसेच गड किल्ल्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वराज्य शिलेदार यांच्या वतीने प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी मनोरंजन उद्यानात शिवकालीन शस्त्रांचे, नाणी, जुनी नाणी व शिक्यांचे तसेच गड किल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याकाळी वापरले जाणाऱ्या तलवारी, भाले, मराठा धोप, मराठा सैनिक, अश्वकुंज, गजकुंज, फरशी, विटा, जगदापुरी, मुघल तलवार, वाघ नखे, कट्यार, अशा विविध प्रकारातील शस्त्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
याचबरोबर गडकिल्ले बनविण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती, यामध्ये रत्नदुर्ग, सुवर्णदुर्ग, पुरंदर, रामशेज, लाल किल्ला, सिंधुदुर्ग, असे एकूण १६ किल्ले प्रदर्शनात मांडण्यात आले होते.
त्याकाळी मराठा सैनिकांनी वापरलेली शस्त्रे, वापरात आलेली नाणी व शिक्के यांची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रितेश भोसले यांनी दिली.
MUM25E78890
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

