विक्रमगड नगरपंचायत कार्यालयकडून ३०४ लाभार्थ्यांना मिळाले जन्म दाखले.

विक्रमगड नगरपंचायत कार्यालयकडून ३०४ लाभार्थ्यांना मिळाले जन्म दाखले.
Published on

तहसील कार्यालयाकडून ३०४ लाभार्थ्यांना जन्म दाखले
विक्रमगड नगरपंचायत हद्दीतील स्थानिकांना दिलासा
विक्रमगड, ता. १९ (बातमीदार) : विक्रमगड नगरपंचायत कार्यालयाकडून तहसीलदाराच्या आदेशान्वये जन्म दाखले मिळत असल्याचे समजताच गेल्या दोन-चार महिन्यांपासून जन्म दाखले मिळविण्याकरिता योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करून प्रकरणे तहसीलदार कार्यालयात समाविष्ट केली होती. त्यानुसार प्रभारी मुख्याधिकारी व तहसीलदार चारुशीला पवार यांनी नागरिकांची समस्या लक्षात घेत तत्काळ योग्य कागदपत्रे असणाऱ्या नगरपंचायत हद्दीतील ३०४ लाभार्थ्यांना नगरपंचायत कार्यालयात उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, नगरसेवक मनोज वाघ यांच्या उपस्थितीत जन्म दाखल्याचे वितरण करीत येथील जनतेला दिलासा दिला आहे.
यापूर्वी उच्च न्यायालयाच्या डिसेंबर २०१३च्या एका आदेशानुसार राज्य शासनाने परिपत्रक जारी केल्यापासून उशिरा नोंदणी करणाऱ्यांना न्यायालयाची पायरी चढावी लागत होती. विक्रमगड येथे न्यायालय नसल्याने जव्हार किंवा वाडा या ठिकाणी जाऊन पैशाच्या भुर्दंडाबरोबरच वेळेचा अपव्यय होत होता. त्यामुळे ही बाब खर्चिक व नाहक त्रास देणारी ठरत होती. हे आदेश तहसीलदारांमार्फत व्हावेत, अशी मागणी होत असल्याने हे आदेश पुन्हा तहसीलदारांमार्फत देण्यात आले. मात्र पुन्हा या योजनेमध्ये स्थगिती आल्याने सद्य:स्थितीत दाखल्यासाठी नवीन प्रकरणे पुढील आदेश होईपर्यंत थांबली आहेत. त्यामुळे आता पुन्हा गरीब जनतेची फरपट होते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पुन्हा स्थगिती
स्थगितीपूर्वी लाभार्थ्यांनी केलेल्या प्रकरणावर योग्य कागदपत्रे पडताळणी करून नगरपंचायत कार्यालयाकडून सोमवारी ३०४ जन्म दाखल्यांचे आदेश दिले आहेत. मात्र सद्य:स्थितीत पुन्हा या कामी स्थगिती आल्याने नवीन प्रकरणे स्वीकारणे थांबविले आहे, अशी माहिती तहसीलदार व प्रभारी मुख्याधिकारी चारुशीला पवार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com