''या'' योजनेच्या लाभार्थ्यांस आर्थिक मदतीचे वितरण
‘या’ योजनेच्या लाभार्थ्यांस आर्थिक मदतीचे वितरण
पालघर, ता. १९ (बातमीदार) : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मनोरमार्फत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांस जिल्हा अग्रणी बँक व आर्थिक साक्षरता सल्ला केंद्र, पालघर यांच्यावतीने विमा रकमेचे वितरण जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विशाल वाघ, मनोर शाखेचे व्यवस्थापक नवदीप यादव, वैभव विधाते, वित्तीय साक्षरता अधिकारी उज्ज्वला कोकणे आदी उपस्थित होते.
या योजनेचा उद्देश कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षेची हमी देणे हा आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांची आर्थिक सुरक्षितेसाठी ही विमा योजना आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या वेळी केले तर लाभार्थ्यांनीही सरकारच्या या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विशाल वाघ यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत गरीब गरजू कुटुंबास आर्थिक मदतीचा लाभ मिळाला असून, भविष्यातही गरीब गरजू नागरिकांसाठी या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय बँकांकडून करण्यात येत आहे.
१८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ही योजना खुली आहे. वार्षिक फक्त रु. ४३६च्या प्रीमियममध्ये दोन लाखांचा विमा संरक्षण मिळतो. मृत्यूनंतर कुटुंबीयांना थेट आर्थिक मदत दिली जाते. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या बँकेत/शाखेस अवश्य भेट द्या, असे आवाहनही गोविंद बोडके यांनी केले आहे.
-
फोटो प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लाभार्थ्यांना विमा लाभ देताना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

