ठाणे पालिका हद्दीत स्मार्ट चोरी
ठाणे पालिका हद्दीत स्मार्ट चोरी
तीन हजार १५५ स्मार्ट मीटर चोरीला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाणे महापालिका हद्दीत पालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र पाण्याची होणारी चोरी, पाणीगळती आणि पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेच्या मध्यमातून स्मार्ट मीटर बसवले होते; मात्र मीटर बसविण्यात आल्यापासून आतापर्यंत तीन हजार १५५ स्मार्ट मीटर चोरीला गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यात सर्वाधिक ९३६ स्मार्ट मीटर हे कळवा, त्या खालोखाल वागळेत ६३१ मीटर चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागासमोर पाणीचोरीसह स्मार्ट मीटरच्या चोरी रोखण्याचे आवाहन उभे ठाकले आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीतील झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय व बेसुमार पाणी वापरावर आळा बसावा, यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून २०१९ पासून शहरात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात झाली आहे. या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून किती पाणी वापरले याची अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत एक लाख १३ हजार ३२८ नळजोडण्या असून, त्यातील एक लाख पाच हजार नळजोडण्यांवर हे मीटर बसविण्यात आले आहेत.
पाणीचोरी, पाणीगळती आणि पाण्याचा वापर ठाणोकरांनी योग्य प्रमाणात करावा या उद्देशाने हे मीटर बसविण्यात आले आहेत. एका मीटरमागे सहा हजार ६०० रुपयांचा खर्च येत आहे; मात्र या मीटरचे काम अचूक होत नसल्याचे ठाणेकरांना गेलेल्या बिलांमधून स्पष्ट झाले होते. त्यांना वाढीव बिले जात असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर स्मार्ट मीटरच्या बाबतीत ज्या काही त्रुटी दूर केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला, परंतु झोपडपट्टी भागात लावलेले स्मार्ट मीटर चोरीला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
सहजपणे हे मीटर चोरीला जात आहेत, स्मार्ट मीटर लावलेला पीव्हीसी पाइप कापून मीटर चोरले जात आहेत. या मीटरच्या खालील बाजूस पीतळ आहे, ते विकून साधारणपणे ४०० ते ५०० रुपये मिळू शकतात. त्याच हेतूने मीटरची चोरी होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यानुसार २०२९ पासून ते २०२५ आतापर्यंत तीन हजार १५५ मीटर चोरीला गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरची चोरी रोखण्याचे आता पालिकेपुढे नवे आवाहन उभे ठाकले आहे.
….……………………….
प्रभाग - चोरीला गेलेल्या मीटरची संख्या
कोपरी - नौपाडा - २६९
उथळसर - ५७
लोकमान्यनगर - २९२
वागळे इस्टेट - ६३१
वर्तकनगर - ३४
माजिवडा - ५७
कळवा - ९३६
मुंब्रा - ४६४
दिवा - ४१५
एकूण - ३१५५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

