

अंबरनाथमध्ये पदयात्रा
अंबरनाथ, ता. १९ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने ''जय शिवाजी जय भारत'' पदयात्रा आयोजित केली होती. अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी अभिषेक पराडकर, उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या वतीने शहरात ''जय शिवाजी जय भारत'' पदयात्रा आयोजित केली होती. मुख्याधिकारी पराडकर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबरनाथ (पूर्व) येथून हुतात्मा चौक, रेल्वे ओव्हर ब्रिजमार्गे, मटका चौक, कल्याण-बदलापूर रोडमार्गे महात्मा गांधी विद्यालयपर्यंत ''जय शिवाजी जय भारत'' पदयात्रा काढण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.