नियमबाहय स्कुल बस चालकांवर आरटीओचा कारवाईचा बडगा
नियमबाह्य स्कूल बसचालकांवर आरटीओचा कारवाईचा बडगा
नऊ महिन्यांत ८० वाहनांवर कारवाई; ५,६०,१५० रुपयांचा दंड वसूल
वाशी, ता. १९ (बातमीदार) :
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने लागू केलेल्या नियमावलीनुसारच स्कूल बस असणे बंधनकारक असताना नियमावलीतील बहुतांश नियम धुडकावून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचे प्रकार सुरू आहे. या स्कूल बस वाहनचालकांविरोधात नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालया (आरटीओ)ने कारवाईचा बडगा उगरला आहे. १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ मार्च २०१९ या नऊ महिन्यांच्या कालावाधीत ६७५ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८० स्कूल बसवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पाच लाख ६० हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर नवी मुंबईत आरटीओकडून एकूण एक हजार १७४ वाहनांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात शालेय विद्यार्थी वाहतुकीतील वाहनांना झालेल्या अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन या वाहतुकीबाबत स्वतंत्र धोरण राज्य शासनाने आखून कडक नियमावली केली आहे. नियमावलीमध्ये शाळेचे प्रशासन, बसचा ठेकेदार व प्रशासनाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. शालेय बसला पिवळा रंग व चालकाकडे पाच वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव, तसेच बिल्ला आवश्यक आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट, विद्यार्थ्यांचे थांबे आदींची माहिती. शालेय वाहनासोबत शालेय प्रशासन व कंत्राटदार यांनी विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी सहाय्यकाची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बस १५ वर्षांपेक्षा जुनी नसावी, असा नियम घालण्यात आला आहे, मात्र स्कूल बसचालकांकडून नियमांचे सर्रासपणे उल्लघन करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते, मात्र स्कूल बसचालकदेखील नियमांचे उल्लंघन करून बिनधास्तपणे वाहने चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाची नियमावली बहुतांश प्रमाणात कागदावरच असल्याचे चित्र आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसवर आरटीओकडून कारवाई करण्यात येत आहे.
चौकट
स्कूल बसच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची उपप्रादेशिक परिहवन कार्यालयाकडून पाहणी करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते.
दत्तात्रय सांगोलकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

