सहा पोलिस ठाण्यांत म्हाडाने उभारले हिरकणी कक्ष

सहा पोलिस ठाण्यांत 
म्हाडाने उभारले हिरकणी कक्ष
Published on

सहा पोलिस ठाण्यांत
म्हाडातर्फे हिरकणी कक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : सार्वजनिक ठिकाणी आपल्या बाळाला स्तनपान करताना महिलांची मोठी गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून उपनगरातील सहा पोलिस ठाण्यांत हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. त्यामुळे महिला कर्मचारी आणि अभ्यागत महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हाडाकडून अन्य ४१ ठिकाणी हिरकणी कक्षासाठीच्या जागेचा शोध सुरू आहे.
म्हाडाने नुकताच आपल्या मुख्यालयात हिरकणी कक्ष उभारला आहे. त्यामुळे महिला कर्मचारी, महिला अभ्यागतांना आपल्या बाळाला स्तनपान करायचे असेल, तर सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याच धर्तीवर म्हाडा पूर्व आणि पश्चिम उपनगरात पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, एमएसआरडीसी अशा वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यालयांच्या ठिकाणी हिरकणी कक्षाला जागा मिळावी, म्हणून पत्राद्वारे विनंती केली आहे. त्यानुसार सहा पोलिस ठाण्यांनी हिरकणी कक्ष उभारण्यास हिरवा कंदील मिळताच म्हाडाने हे काम पूर्ण केले आहे, तर दोन पोलिस ठाण्यांत हिरकणी कक्ष उभारण्यास ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तेथेही लवकरच काम सुरू केले जाणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com