

ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर भर
पनवेल, ता. १० (बातमीदार) : पनवेल शहरासह वसाहतींमधून ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली. आयोजकांनी ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर या वेळी भर दिल्याचे दिसून आले.
जिजाऊंच्या लेकींनी हातात घेतलेली मशाल, पारंपरिक कपडे, शिवगर्जनेचा जयघोष आणि जोडीला शाहिरांच्या स्वरांच्या वातावरणामुळे अवघा पनवेल परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक वेशभूषेत शिवभक्तांनी गर्दी केल्यामुळे शिवाजी चौकात वातावरण शिवमय झाले होते. पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी ‘महाराज की जय’च्या जयघोषात, ढोल ताशांच्या गजरात पनवेल महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.