

ठक्कर प्लाझा इमारत सीलबंद
भिवंडी, ता. १९ (वार्ताहर) ः ठाणगे आळी या गजबजलेल्या बाजारपेठ परिसरातील ठक्कर प्लाझा या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरील क्लासेस असलेल्या गाळ्यामध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. ती ठक्कर प्लाझा इमारत सीलबंद करण्यात आली.
आग लागली असता त्या ठिकाणी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांची स्थानिक युवकांनी जीव धोक्यात घालून सुटका केली. त्यानंतर आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली; परंतु या शॉपिंग कॉम्प्लेक्स असलेल्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर क्लास व कार्यालये आहेत. शिवाय इमारतीच्या तळमजल्यावर मिठाई व खाद्य पदार्थविक्रीचे दुकान असून भट्टीसुद्धा आहे. असे असताना या इमारतीमध्ये कोणतीही अग्निशमन यंत्रणा ठेवण्यात आली नसल्याने या घटनेची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी तातडीने इमारत सीलबंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रभाग समिती क्रमांक पाचचे साहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव, अग्निशमन दलप्रमुख राजेश पवार आदींनी रात्री उशिरा या इमारतीमधील येण्या-जाण्याचा रस्ता बंद करून ही इमारत सीलबंद केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.