

महापालिकेची अंतिम अभय योजना
उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) :- मालमत्ता कर भरण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने अंतिम अभय योजना जाहीर केली आहे. २४ फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना मोठी सवलत मिळणार आहे. ६ मार्चपूर्वी कराचा पूर्ण भरणा करणाऱ्या नागरिकांना १०० टक्के व्याज व दंड माफीचा लाभ मिळेल. यानंतर सवलत टप्प्याटप्प्याने कमी केली जाणार आहे. ही अंतिम संधी असून, यानंतर अशी कोणतीही योजना लागू केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिला आहे.
आमदार कुमार आयलानी यांनी ९ फेब्रुवारीला महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून अभय योजना तातडीने लागू करण्याची मागणी केली होती; मात्र आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी कोणतीही अभय योजना लागणार नाही, असे लेखी पत्र काढून शहरांत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी आणि महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची विशेष बैठक झाली. अखेर महापालिकेने त्वरित निर्णय घेत अभय योजनेची अंमलबजावणी करण्याचे ठरवले. आमदार कुमार आयलानी यांनी नागरिकांना विनंती करत सांगितले की, महापालिका कधीही मोठ्या प्रमाणावर जप्तीची कारवाई करू शकते. त्यामुळे कर थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेऊन वेळेत कर भरणे गरजेचे आहे. ही योजना नागरिकांच्या हितासाठी आणली आहे. या संधीचा लाभ घ्या अन्यथा कठोर वसुली टाळणे शक्य होणार नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
उल्हासनगर महापालिकेने स्पष्ट केले आहे की, योजनेचा लाभ न घेतल्यास कठोर वसुली आणि संपत्ती जप्तीच्या नोटिसा पाठवल्या जातील. कर थकविल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून थेट जप्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे. बँक खात्यावरदेखील थेट थकबाकी वसुलीची कारवाई शक्य होईल. अशी परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने संपत्ती कर भरण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उल्हासनगर महापालिकेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.