अपुऱ्या एसटी बसेसमुळे साई-माणगाव मार्गावरील प्रवाशांचे हाल
अपुऱ्या एसटी बसेसमुळे साई-माणगाव मार्गावरील प्रवाशांचे हाल
माणगाव, ता. १९ (वार्ताहर) ः माणगाव-म्हसळा-दिघी या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले असले तरीही या मार्गातील छोट्या गावांतील, वाड्यांतील प्रवाशांना एसटी बसची तासन्तास वाट पाहात ताटकळत उभे राहावे लागत आहे.
श्रीवर्धनमार्गे येणाऱ्या गाड्या म्हसळा सोडल्यानंतर चांदोरे, नळेफोडी, साई, विहुले, डोंगरोळी, नाईटने, सुर्ले-बोर्ले, मोर्बा या रस्त्यातील बस स्टॉपवर काही बसगाड्या अजिबात थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांतून जास्तीचे पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. श्रीवर्धन ते माणगावपर्यंतचा रस्ता चकाचक झाला आहे, परंतु या मार्गावरील अनेक गावांतील नागरिकांना एसटी बसची पुरेशी सुविधा मिळत नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. एसटी महामंडळाने याबाबत गांभीर्याने विचार करून ज्यादा एसटी बसची सुविधा करावी, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

