भाजपच्या २३ नगरसेवकांची घरवापसी

भाजपच्या २३ नगरसेवकांची घरवापसी
Published on

भाजपच्या २३ नगरसेवकांची घरवापसी
मुंबईत बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ ः विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार संदीप नाईक यांच्यासोबत भाजपमधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात गेलेल्या बेलापूरमधील भाजपच्या नगरसेवकांनी पुन्हा भाजपमध्ये वापसी केली आहे. मुंबई येथे भाजप पक्ष कार्यालयात मंगळवारी (ता. १८) उशिरा या सर्वांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
बेलापूर मतदारसंघात पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे संदीप नाईक यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत २३पेक्षा जास्त नगरसेवक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या बेलापूरमधील उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात प्रचार केला. निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप नाईक यांचे प्रचाराचे काम केले; मात्र निकालानंतर म्हात्रे यांचा विजय झाल्यामुळे या सर्व नगरसेवकांसमोर आगामी महापालिका निवडणुकीतील प्रश्न उभा राहिला होता. निवडणुका लक्षात घेत अनेकांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश घेण्याकरिता विविध पातळीवर धडपड सुरू केली होती; मात्र स्थानिक नेत्यांनी विरोध केल्यामुळे पक्षाच्या प्रदेशपातळीवरील नेत्यांकडून या नगरसेवकांच्या प्रवेशाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. अनेकदा प्रवेशाच्या तारखांवर तारखा मिळाल्यावर अखेर मंगळवारी रात्री मुंबईत या नगरसेवकांचा अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर प्रवेश सोहळा पार पडला.
...
यांनी केला पक्षप्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये माजी नगरसेविका अंजली वाळूंज, दयावती शेवाळे, फशीबाई भगत, वैजयंती भगत, रूपाली भगत, सुजाता पाटील, जयश्री ठाकूर, शिल्पा कांबळी, मीरा पाटील, नेत्रा शिर्के, श्रद्धा गवस, रूपाली किस्मत भगत, सुरेखा नरबागे, माजी नगरसेवक सुरज पाटील, सुनील पाटील, रवींद्र इथापे, अशोक गुरखे, डॉ. जयाजी नाथ, विशाल डोळस, विनोद म्हात्रे आदी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला, मात्र या वेळी माजी महापौर जे. डी. सुतार, माजी नगरसेवक अमित मेढकर व गणेश म्हात्रे अनुपस्थित होते, अशी माहिती भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com