मतमतांतरे

मतमतांतरे
Published on

मतमतांतरे
--
मिशन अंतरीक्षची उत्सुकता
आठ महिन्यांपासून अवकाशात अडकून पडलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी बूच विल्मोर १९ मार्चपर्यंत पृथ्वीवर परतणार आहेत. इलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’च्या ड्रॅगन कॅप्सूलमधून ते परततील. १२ मार्चला क्रू-१० यान ड्रॅगन कॅप्सूलसह लॉन्च होईल आणि अवकाश स्थानकावर चार अंतराळवीरांना सोडून सुनीता व बूच यांना घेऊन ते परतेल. केवळ आठ दिवसांच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर रवाना झालेल्या सुनीता आणि बूच आठ महिन्यांपासून तिथे अडकून पडले आहेत. ‘क्रू-१०’चा प्रवास अत्यंत जोखमीचा आहे, कारण यानाचा वेग असेल ताशी २८ हजार किमी आणि तापमान निर्माण होईल सुमारे १५०० अंश. पृथ्वीकक्षेत प्रवेशानंतर त्याचा वेग कमी व्हायला प्रारंभ होईल. एवढे टप्पे नियोजितपणे पार पडले, तर पॅराशूटने कॅप्सूल पृथ्वीवर उतरेल, परंतु त्यात काही उणिवा राहिल्या, तर मात्र ती सर्वात मोठी जोखीम ठरेल. सुनीता आणि बूच सुखरूप पृथ्वीवर येतील आणि अंतराळातील मोहीम यशस्वी करतील याचा विश्वास आहे.
- दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई

‘जन आरोग्य’कडे दुर्लक्ष नको
सरकारीबरोबर खासगी रुग्णालयांत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू रुग्णांवर उपचार केले जातात, परंतु सध्या सरकारची तिजोरी विविध योजनांमुळे रिकामी झाली आहे; त्यामुळे जन आरोग्य योजनेअंतर्गत केलेल्या उपचारांपोटी खासगी रुग्णालयांची दीड हजार कोटींहून अधिक रकमेची बिले सरकारदरबारी पडून आहेत. त्यामुळे मोफत योजनेचा लाभ देणाऱ्या खासगी रुग्णालयांतील कर्मचारीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. निधीअभावी योजना बंद करण्याची वेळ येईल. त्यामुळे सरकारने त्यात वेळीच लक्ष घालून अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३,०५९ कोटींच्या निधीचा योग्य वापर करावा आणि खासगी रुग्णालयांचे थकीत बिल मंजूर करावे. जेणेकरून योजना रखडणार नाही.
- दत्ता खंदारे, धारावी

उमेदवारीसाठीच पक्षप्रवेश?
२०२४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी इतर पक्षांतील अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश केला. त्यांना उमेदवारीही दिली गेली; पण त्यातील अनेकांना पराभव पत्करावा लागला, वास्तविक कोणत्याही नेत्याने एखाद्या पक्षात प्रवेश केला, तर हरल्यानंतरही इमान राखून पक्षवाढीचे काम करणे आवश्यक आहे, परंतु त्यातील काही उमेदवार आता कुठे आहेत? शिवसेना पक्षाशी ते एकनिष्ठ आहेत का, याचेही उत्तर शोधणे जरुरीचे आहे. बाहेरून आलेले अनेक नेते केवळ उमेदवारीसाठी पक्षाचा झेंडा हातात घेतात; पण पराभूत झाल्यानंतर पक्षात कार्यरत राहात नाहीत.
- अरुण खटावकर, लालबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com