

‘पीव्हीआर’मध्ये तांत्रिक बिघाड
‘छावा’ चित्रपटाच्या प्रेक्षकांची निराशा
मुंबई, ता. १९ : ‘छावा’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे; मात्र लोअर परेल येथील पीव्हीआर चित्रपटगृहात या चित्रपटाचा शो पाहायला गेलेल्या प्रेक्षकांचा उत्साह तांत्रिक बिघाडामुळे मावळला. सकाळी ८:३० वाजता सुरू झालेल्या या शोदरम्यान काही मिनिटांतच आवाजात समस्या निर्माण झाली. थिएटर प्रशासनाने स्क्रीन बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र तीन वेगवेगळ्या ऑडिटोरियममध्येही तोच त्रास सुरू राहिला. या प्रकारामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला.
प्रेक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना वारंवार जागा बदलण्यास सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. काही प्रेक्षकांनी सांगितले की, त्यांनी खास वेळ काढून, नोकरीवरून हाफ डे घेऊन हा चित्रपट पाहण्याची योजना आखली होती, मात्र हा अनुभव पूर्णपणे निराशाजनक ठरला. या गोंधळामुळे सिनेमागृहात तणावाची स्थिती निर्माण झाली. अखेर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. पीव्हीआर प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ‘छावा’ने आतापर्यंत २३० कोटींहून अधिक कमाई केली असून, विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अन्य कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट चर्चेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.