रेल्वे प्रवासी भजन मंडळ स्‍पर्धा

रेल्वे प्रवासी भजन मंडळ स्‍पर्धा
Published on

रेल्वे प्रवासी भजन मंडळ स्‍पर्धा
रविवारी वाशीत आयोजन
वाशी, ता. २०, वार्ताहर : नवी मुंबईतील नागरिकांना टाळ-मृदंगाच्या नादात सुस्वर भजन ऐकण्याची संधी रविवारी (ता. २३) उपलब्ध झाली आहे. वाशीतील सिडको सभागृहात रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवरील प्रवासी भजन मंडळे सहभागी होणार आहेत. सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान भजनाची आवड असणाऱ्या प्रवाशांसाठी ही स्पर्धा एक पर्वणी ठरणार आहे. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था, छत्रपती शिवराय भजन मंडळ, वाशी, श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ, वाशी संलग्न नवविधा भक्ती सेवा समिती हार्बर लाइन यांच्या वतीने ही ‘भक्ती शक्ती रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे दुसरे पर्व आहे. स्पर्धेत विजेता ठरलेल्या भजनी मंडळांना प्रथम क्रमांक ११,०११ रुपये, द्वितीय क्रमांक परितोषक ८,०११ रुपये आणि तृतीय क्रमांक पारितोषिक ५,०११ रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ पारितोषिकेही ठेवण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. स्पर्धेच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सत्यनारायण पूजा, रेल्वे पूजन, वारकरी दिंडी इत्यादींचा यात समावेश असेल. पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला असून, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले जाणार आहे. स्पर्धेचे समाज माध्यमांतून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com