राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मध्य रेल्वेची दमदार कामगिरी!
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मध्य रेल्वेची दमदार कामगिरी
तब्बल २६ पदकांवर उमटवली मोहोर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मध्य रेल्वेच्या खेळाडूंनी उत्तराखंडमधील डेहराडून येथे पार पडलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपली चमकदार छाप उमटवली. त्यांनी पाच सुवर्ण, ११ रौप्य आणि १० कांस्यपदकांची कमाई करीत एकूण २६ पदकांवर आपली मोहोर उमटवली. या कामगिरीमुळे मध्य रेल्वेच्या क्रीडाक्षेत्रातील वर्चस्व अधिक बळकट झाले आहे.
या प्रतिष्ठित स्पर्धेत मध्य रेल्वेच्या ३० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यांनी वैयक्तिक तसेच सांघिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळ करीत रेल्वेच्या गौरवशाली परंपरेला न्याय दिला. विशेषतः अंकिता ध्यानी हिने अॅथलेटिक्समध्ये जबरदस्त कामगिरी करीत तीन हजार मीटर आणि पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्ण, तर १० हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. तेजस शिरसे याने पुरुषांच्या ११० मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. वंशिता वर्मा हिने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावून उत्तुंग यश मिळवले.
मध्य रेल्वेच्या खेळाडूंनी एकूण पाच सुवर्ण, ११ रौप्य आणि १० कांस्यपदके मिळवली. पुरुषांच्या खो-खो संघाने सुवर्ण जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. पुरुष व्हॉलीबॉल संघाने रौप्यपदक, तर महिला व्हॉलीबॉल आणि महिला कबड्डी संघांनी कांस्यपदक पटकावले. बॅडमिंटन, डायव्हिंग, जलतरण आणि वेटलिफ्टिंगमध्येही रेल्वेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या ऐतिहासिक यशाबद्दल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
सुवर्णपदक विजेते :
अंकिता ध्यानी - अॅथलेटिक्स (३००० मीटर, ५००० मीटर)
तेजस शिरसे - ११० मीटर हर्डल्स (राष्ट्रीय विक्रम)
वंशिता वर्मा - वेटलिफ्टिंग
रामजी कश्यप - पुरुष खो-खो संघ
रौप्यपदक विजेते :
अंकिता ध्यानी - अॅथलेटिक्स (१०,००० मीटर)
प्रणव गुरव - अॅथलेटिक्स (१०० मीटर)
साक्षी सिंघारे - महिला वेटलिफ्टिंग
मुकुंद अहिर - पुरुष वेटलिफ्टिंग
संकेत सरगर - पुरुष वेटलिफ्टिंग
ईशा वाघमोडे - प्लॅटफॉर्म डायव्हिंग
अवंतिका चव्हाण - ५० मीटर फ्रीस्टाइल आणि ४x१०० फ्रीस्टाइल रिले स्विमिंग
मुथु एलाक्किया - पुरुष व्हॉलीबॉल संघ
उदय उत्तकर, ऋतुराज बिडकर - पुरुष वॉटर पोलो संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

