तुपगावातील रस्ताच चोरीला!
कर्जत, ता. २६ (बातमीदार) ः तुपगाव-चौकदरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यासाठी मध्यंतरी आमदार निधीतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला; मात्र रस्त्याचे कामच करण्यात आलेले नाही. शिवाय ठेकेदाराला रस्त्याची बिले अदा करण्यात आल्याची चर्चा असल्याने रस्ता चोरीला गेल्याप्रकरणी तुपगाव बौद्धवस्तीतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्य नीलेश मोरे यांच्या सतर्कतेमुळे हा गैरव्यवहार उघड झाला.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि रस्ता चांगल्या दर्जाचा तयार करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या रायगड जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड आणि महासचिव धर्मेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच कर्जतमधील रायगड जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यांची भेट घेत गैरप्रकाराची माहिती दिली. दोन दिवसांत संपूर्ण माहिती न मिळाल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात चुकीची माहिती दिली जात आहे. ठेकेदाराच्या नावावर किती बिल काढले, यात कोणाकोणाचा सहभाग आहे, याची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
रस्त्याच्या कामाचे ठेकेदाराला कोणतीही रक्कम दिलेली नाही. खोटी माहिती सादर करून प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या ठेकेदारावर आणि सहकार्य करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

