मुलुंडमध्ये ‘देणे समाजाचे’ महोत्‍सव

मुलुंडमध्ये ‘देणे समाजाचे’ महोत्‍सव

Published on

मुलुंडमध्ये ‘देणे समाजाचे’ महोत्‍सव
मुलुंड, ता. २५ (बातमीदार) ः महाराष्‍ट्र सेवा संघ, मुलुंड पश्‍चिम येथे ‘देणे समाजाचे’ महोत्‍सवाचे आयोजन शनिवार (ता. १), रविवार (ता. २) रोजी करण्यात आले आहे. ‘आर्टिस्ट्री’ या व्यासपीठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजाला करून दिली जाते. तसेच त्यांना आर्थिक तसेच इतर मदत मिळवून दिली जाते. २००५ ते २०२४ या कालावधीत जवळपास २८० सामाजिक संस्था या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या. सहभागी संस्थांकडून कोणतेही शुल्क आकारणी न करता हा भव्य उपक्रम गेली २० वर्षे राबवला जात आहे. अतिशय काटेकोरपणे, स्वतः भेट देऊन, पारखून संस्‍थांची निवड केली जाते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. या महोत्‍सवात सहभागी व्हावे, असे आवाहन वीणा गोखले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com