शालेय राष्ट्रीय रोलर ॲथलेस्टिक स्पर्धेत 
रेयांश बनेला दोन सुवर्णपदके

शालेय राष्ट्रीय रोलर ॲथलेस्टिक स्पर्धेत रेयांश बनेला दोन सुवर्णपदके

Published on

शालेय राष्ट्रीय रोलर ॲथलेटिक्स स्पर्धेत
रेयांश बनेला दोन सुवर्णपदके
मुलुंड, ता. २५ (बातमीदार) ः शालेय राष्ट्रीय रोलर ॲथलेटिक्स चॅम्‍पियन स्पर्धेत स्केटिंगमधे रेयांश बने याने दोन सुवर्णपदकावर नाव कोरत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारा रेयांश सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा अमेय कल्ब, विरार येथे रविवारी (ता. २३) झाली. रेयांश बने हा महाराष्ट्रीय शिक्षण संस्था भांडुपचे सचिव आणि माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचा नातू असून युरो स्कूलमध्ये दुसरीमध्ये शिकत आहे. रोलर ॲथलेस्टिक असोसिएशन महाराष्ट्र व रोलर ॲथलेटिक्स फेडरेशन आँफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या शालेय स्पर्धा २०२४-२५ मध्ये त्‍याने केलेल्‍या कामगिरीचे कौतुक होत आहे. त्‍याने आतापर्यंत विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये २८ सुवर्ण, १० रौप्य आणि आठ कांस्यपदके पटकावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com