पालघरला उष्णतेचा तडाका बसणार

पालघरला उष्णतेचा तडाका बसणार
Published on

पालघरला उष्णतेचा तडाका बसणार
हवामान विभागाचा इशारा
वाणगाव, ता. २५ (बातमीदार) : भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक विभाग, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांच्या कालावधीत कोकण विभागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन-चार अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता आहे.
कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सियस आणि किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सियसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तसेच २६ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यासाठी उष्ण व दमट वातावरण राहणार आहे. उष्णतेत वाढ व आर्द्रतेत घट होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतीचे नियोजन असे करा
- फळबाग, भाजीपाला आणि फुलपिकांना गरजेनुसार पाणी द्यावे.
- पाणी देण्याची वेळ सकाळी लवकर किंवा संध्याकाळी निवडावी.
- झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे, जेणेकरून बाष्पीभवन कमी होईल.
- नवीन लागवड केलेल्या रोपांना सावली देऊन त्यांचे संरक्षण करावे.
- पाण्याची कमतरता असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.
- आंबा, केळी, पपईसारख्या फळांना पिशवीने झाकून उन्हापासून बचाव करावा, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.
----------------------------

पशुपालकांनी जनावरांची विशेष काळजी घ्यावी :
- जनावरांना ताजे, स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
- दुपारी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहील.
- शेडच्या छतावर वाळलेले गवत टाकावे, जेणेकरून उष्णतेपासून संरक्षण होईल, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com