चक्रीवादळामुळे गंजाड येथे घराचे नुकसान
चक्रीवादळामुळे गंजाडमध्ये घराचे पत्रे उडाले
प्रशासनाकडून मदतीची मागणी
कासा, ता. २५ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायतीच्या गणेशबाग गुजरपाडा येथे सोमवारी (ता. २४) दुपारी आलेल्या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. विलास जयराम हाडळ यांच्या घरावरील नऊ ते दहा पत्रे उडाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाडळ कुटुंबात सहा सदस्य असून सुदैवाने शाळकरी मुले त्यावेळी शाळेत असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. हाडळ कुटुंबाला यापूर्वीही अशाच संकटाचा सामना करावा लागला होता. २०२१-२२ मध्येही त्यांच्या घरावरील पत्रे वाऱ्यामुळे उडाले होते; परंतु त्यावेळी कोणतीही शासकीय मदत मिळाली नव्हती. त्यामुळे या वेळी तरी शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केले आहे. तसेच ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. जर वेळेत मदत मिळाली नाही, तर अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचेही या वेळी स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाने मदतीचे आश्वासन दिले आहे.
ग्रामपंचायत सदस्य वनिता हाडळ यांनी सांगितले, की या घटनेची माहिती सरपंचांना दिली आहे. ग्रामपंचायत बैठकीत हा प्रश्न मांडून पीडितांना मदत देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

