वारीची शिस्त हा यशाचा मार्ग
वारीची शिस्त हा यशाचा मार्ग
सचिन कोरे यांचे प्रतिपादन; दांडेकर महाविद्यालयात उत्कंठा युवा महोत्सव
पालघर, ता. २६ (बातमीदार) : वारकऱ्यांची शिस्त, त्यांची नियमितता आणि त्यांची निरलसता अंगी बाणवल्यास यशाचा मार्ग निश्चितपणे सुकर होईल, असे प्रतिपादन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सचिन कोरे यांनी केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय आयोजित उत्कंठा या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
उत्कंठा युवा महोत्सवामध्ये वारीचा विषय केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगाने दांडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर वारीमय केला होता. मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांनीच विठ्ठल-रखुमाईच्या भव्य मूर्ती साकारण्यात आल्या होत्या. पखवाज, वीणा, चिपळ्यांच्या प्रतिकृती तयार केल्याने महाविद्यालयीन परिसरात वारीचा सुखद अनुभव येत होता. या युवा महोत्सवाचे नियोजन दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले होते. महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये आत्मसात करता येत असल्याची भावना विद्यार्थी प्रतिनिधी सायली शिंदे आणि सोहम घरत यांनी सांगितले.
महाविद्यालयाने विद्यापीठ युवा महोत्सवात २१ बक्षिसे, अंतिम फेरीत १२ बक्षिसे जिंकत तसेच राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांचे कलागुणांतील यश बघून प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी त्यांचे कौतुक केले. युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा. मेहश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रेय मिश्र, प्रा. तेजस चौधरी, प्रा. मकसूद मेमन, प्रा. हर्शल चौधरी, प्रा. संतोष चुरी, प्रा. प्रकाश चाबके, प्रा. हिमांशू पाटील, श्री. मनीष पाटील तसेच सुस्मित तावडे, निधी मोरे आदींसह ४५ विद्यार्थ्यांच्या समूहाने परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

