महाशिवरात्रीपूर्वी खजुराच्या किमतीत वाढ

महाशिवरात्रीपूर्वी खजुराच्या किमतीत वाढ

Published on

गायत्री ठाकूर : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे. या उपवासात काही खास पदार्थांचे सेवन केले जाते. त्यापैकीच एक म्हणजे खजूर. धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने खजूरला महत्त्वपूर्ण स्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त बाजारात खजूरच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे त्याच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उपवासासाठी आणि धार्मिक विधींसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात असल्याने ही वाढ झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.

महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण असून, या दिवशी भगवान शंकराची उपासना केली जाते. या दिवशी लाखो भक्त उपवास करतात. उपवासासाठी खजूर हा एक महत्त्वाचा पदार्थ मानला जातो, कारण तो नैसर्गिकरीत्या गोड असून शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतो. शिवाय महाशिवरात्रीच्या आधीच बाजारपेठेत खजूरसाठी मोठी मागणी निर्माण होते. यामुळे त्याच्या किमती वाढतात. खजूर प्रामुख्याने सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिरात आणि इजिप्तमधून आयात केला जातो; परंतु वाहतूक खर्चात वाढ आणि चलनातील चढ-उतार यामुळे आयात केलेल्या खजूरच्या किमती वाढल्या आहेत.

परदेशातून पुरवठा कमी
महाशिवरात्रीच्या काळात खजूरची मागणी प्रचंड असते. त्यामुळे आम्ही मागील वर्षाच्या तुलनेत जास्त साठा ठेवला आहे, मात्र पुरवठा कमी असल्याने किमती वाढल्या आहेत. खजूर हा हंगामी खाद्यपदार्थ नसला तरी सणांच्या काळात त्याच्या मागणीत मोठी वाढ होते. लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे दरही वाढतात, असे डोंबिवली मार्केटमधील किरकोळ विक्रेते राजेश अग्रवाल म्हणाले.

खजुराची किंमत
घाऊक बाजार खजूरचा दर ८० ते २२० रुपये किलो, तर सरासरी १५० रुपये किलो आहे.

खजूरचे आरोग्यदायी फायदे
- खजूर नैसर्गिक साखरयुक्त असल्याने पटकन ऊर्जा मिळते.
- फायबरयुक्त असल्याने पचनसंस्थेस मदत होते.
- कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते, जे हाडांसाठी चांगले असते.
- पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयासाठी फायदेशीर असतात.
- मधुमेही रुग्णांसाठीदेखील योग्य प्रमाणात सेवन केल्यास खजूर फायदेशीर ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com