महिला पोलिसांसमोर संशयिताचे गैरवर्तन

महिला पोलिसांसमोर संशयिताचे गैरवर्तन

Published on

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : न्यायालयात हजर झाल्यानंतर एका संशयित आरोपीने आवारातच पोलिस व्हॅनमध्ये आपली पँट काढून नग्न होऊन गोंधळ घातला. यानंतर त्याने व्हॅनमध्ये उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचारी आणि महिला पोलिसांना शिवीगाळ करून पोलिसांना आव्हान देण्यास सुरुवात केली. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी संशयित आरोपी आणि त्याची पत्नी, बहीण आणि आणखी एका आरोपीसह इतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणमधील आधारवाडी तुरुंगातून मोहम्मद अली अब्दुल अझीझ शेख (वय ४५) याला भिवंडी न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलिसांनी आणले होते. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्याची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा त्याने सांगितले, की त्याला न्यायालयाच्या तळमजल्यावर असलेल्या शौचालयात जायचे आहे. पोलिसांनी त्याला शौचालयाचा दरवाजा उघडा ठेवण्यास सांगितले. त्याने शौचालयाचा दरवाजा उघडा न ठेवता पोलिस पथकाशी त्याने गैरवर्तन केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयाबाहेर नेले आणि वाहनामध्ये बसविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने त्याची पत्नी आणि बहीण यांना तिथे पाहून जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली आणि पोलिस पथकाला अश्लील शिवीगाळ केली. मोहम्मद अली याची पत्नी आणि बहीण यांनी आणखी एका व्यक्तीसोबत न्यायालय आवारात बेकायदा गर्दी जमवली आणि पोलिसांसोबत धक्काबुक्की केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला पकडत व्हॅनमध्ये बसवले. या घटनेचा राग आल्याने त्याने पोलिस व्हॅनमध्ये आपली पँट काढली आणि नग्न होऊन महिलांसह पोलिसांबरोबर गैरवर्तन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com